*उमरखेडच्या दुर्गम भागात प्रकाशाचा आधार!*
*एन.बी. फाउंडेशनचा उपक्रम | वालतूर, उमरखेड*
आज उमरखेड तालुक्यातील अभयारण्य परिसरातील *वालतूर* गावात एन.बी. फाउंडेशनच्या वतीने गरजू शेतकऱ्यांना *चार्जिंग बॅटरीचे मोफत वाटप* करण्यात आले.
रात्री-अंधारात शेतात जाताना साप, विंचू यांचा धोका असतो. हात प्रकाशाची बॅटरी असेल तर हा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो, हाच विचार मनाशी ठेवून हा उपक्रम सुरू आहे.
आतापर्यंत 18 गावांमध्ये 900 शेतकऱ्यांना लाभ:* झाडगाव, भामरखेडा, धनज, मोहदरी, पिंपरिदिवाट, गगनमाळ, जनुना, अंबाळी, पळशी, नागापूर, बेलखेड, कैलासनगर, मरसुळ, दहागाव, दिंडाळा, चिली, बोथा, वालतूर..शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे
उपक्रमासाठी परिश्रम घेणारे: शेवंतराव गायकवाड, सागर बडे, श्रावण जळके, रामदास काळे, गजानन धोत्रे, कैलास जळके आणि एन.बी. फाउंडेशन टीम

إرسال تعليق