⚡ ब्रेकिंग News

नाम फाउंडेशनचे संस्थापक मा. श्री. मकरंद अनासपुरे यांचा वाढदिवस पुसद येथे साजरा.

 


नाम फाउंडेशनचे संस्थापक मा. श्री. मकरंद अनासपुरे यांचा वाढदिवस पुसद येथे साजरा.

नाम फाउंडेशन पुसद तर्फे जीवन ज्योती एड्स प्रतिबंध व प्रबोधन संस्था, पुसद यांच्या संपर्कातील अनाथ, एकलपालक व गरजू मुलांसोबत हा वाढदिवस अत्यंत प्रेमळ वातावरणात साजरा केला. यावेळी मुलांसोबत आनंदाचे क्षण वाटून घेत त्यांना प्रेम, आपुलकी आणि प्रेरणेचा संदेश देण्यात आला. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आनंद हीच या उपक्रमाची खरी जमेची बाजू ठरली.



समाजातील गरजू, वंचित आणि निराधार घटकांसाठी सातत्याने प्रेरणादायी कार्य करणारे मा. श्री. मकरंद अनासपुरे साहेब यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि त्यांच्या सामाजिक कार्याला अधिकाधिक यश लाभो, हीच जीवन ज्योती एड्स प्रतिबंध व प्रबोधन संस्था, पुसद परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी नाम फाउंडेशन चे स्वप्नील देशमुख, मोंटू देशमुख, पप्पू डोंगरे, सचिन सुरोशे, पंचायत राज चे प्राचार्य अश्विन आडे, जीवन ज्योती चे राहुल गायकवाड उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...