⚡ ब्रेकिंग News

श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद विदर्भाची पंढरी पुसद येथे प्रति पंढरपूर भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजनाची जय्यत तयारी .

श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद विदर्भाची पंढरी पुसद येथे प्रति पंढरपूर भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजनाची जय्यत तयारी 



आषाढ़ी एकादशी विठुरायाची दर्शन यात्रा महोत्सव शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी विदर्भाची पंढरी पुसद येथे येथील श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद येथे विठुरायाच्या भव्य दर्शन सोहळा आषाढी एकादशीला शनिवार दिनांक २५ जुलाई २०२६ संपन्न होणार आहे . माग़िल वर्षी अन्दाजे ६०,००० भाविकानी पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला. ज्या भाविकाना पंढरपुर वारी काही कारणास्तव जावू शकले नाही त्याना प्रति पंढरपुर विठु रायाच्या दर्शनाचा लाभ झाल्याचे सांगीतले.

या दिवशी सकाळी ३:००  वाजता विठुरायाच्या पंचामृताने महापूजेची सुरुवात होणार आहे. या महापूजेसाठी पुसद शहराच्या प्रथम नागरिक ,नगराध्यक्ष सौभाग्यवती मोहिनीताई इंद्रनील भाऊ नाईक आणि माननीय नामदार इंद्रनील भाऊ मनोहरराव नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न होनार आहे .यासोबतच दर्शन बारी मधील प्रथम भाविक तसेच या महापूजेचे मानकरी दीपक आसेगावकर आणि मधुसूदन महाजन परिवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे

.सकाळी ५:०० वाजता विठुरायाची महाआरती होईल . 

त्यानंतर सकाळी ५:३० वाजता 

श्री ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण सकाळी ६;३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत विठुरायाचे भजन व भावगीत ,भक्ती गीत माला व्यासपीठावर होणार आहे . सायंकाळी ७:०० वा. हरिपाठ, सायंकाळी८:३० वा. 

 कीर्तनकार हरिभक्त परायण गणेश महाराज धर्माळे पुसद जिल्हाध्यक्ष वारकरी सेवा विकास व सन्मान समिती यांच्या वतीने रात्री ८:३० ते १०:०० या वेळेमध्ये श्रीहरी कीर्तन संपन्न होणार आहे. 

प्रवेश मार्ग- भाविकांना संस्थांनमध्ये दर्शनाला जाण्यासाठी प्रवेश फक्त गुजरी चौकातील प्रवेशद्वारातूनच राहील याची भाविकांनी नोंद घ्यायची आहे. 

दर्शनाला येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शनासाठी संस्थान द्वारा ख़ालील व्यवस्था केलेली आहे .

बाहेरगावातील आणि इतर भाविकांना बस स्टॅन्ड ते मंदिर आणि मंदिर ते बस स्टॅन्ड जाण्या येण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे . पार्किंग व्यवस्था - यासोबतच भाविकांची वाहने ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था चार चाकी वाहने जुना सरकारी दवाखाना ,

दुचाकी वाहने - बालाजी मंदिर ,संतोषी माता मंदिर परिसर आणि गोल्ड प्लाझा कॉम्पलेस , सराफ लाईन यामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे .

भाविकांना आपली पादत्राने ठेवण्यासाठी मोफत चप्पल स्टॅंडची भव्य व्यवस्था गुजरी चौक येथे करण्यात आलेली आहे .

दिव्यांग भाविकांना व्हीलचेअर द्वारे विठुरायाचे थेट दर्शन सुविधा तसेच वयोवृत्त भाविक गरोदर महिला लहान बाळ असलेल्या माता अंध व्यक्ती यांच्यासोबत अजून एक सहकार्याला थेट दर्शनाची सुविधा कालावधी सकाळी ७:००  ते दुपारी १२:०० आणि सायं ६:०० ते रात्री 11:00 वाजेपर्यंत राहणार आहे . दुपारी १२:०० ते सायं. ६:०० या वेळेमध्ये ही व्यवस्था बंद राहणार आहे तरी भाविकांनी या वेळेमध्येच थेट दर्शनासाठी आपण येऊन आम्हाला सहकार्य करावे अशी संस्थांन द्वारे आपल्याला विनंती करण्यात येत आहे.

आलेल्या सर्व भाविकाना शाबूदाना उसळ ,राजगीरा लाडू आणि चहा ची सोय करण्यात आली आहे.

सम्पूर्ण परिसरात सीसीटीवी क्लोज कैमराचे नियंत्रण कक्ष राहनार आहे.

१६०० सेवेकरी या भव्य महा यात्रेला आपली अमूल्य सेवा देनार आहेत. 

आषाढी एकादशीच्या या यात्रा महोत्सवाच्या आयोजना संबंधी आलेल्या भाविकांना आरोग्य शिबिर जसे ब्लड प्रेशर शुगर चेकअप कॅम्प विशेष अग्नीकर्म युद्ध कर्म आयुर्वेद चिकित्सा चे मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन गुरुवर्य डॉक्टर चंद्रकुमार देशमुख पुणे यांचे मार्गदर्शनातील डॉक्टरांच्या चिमुट द्वारे करण्यात येणार आहे यामध्ये भाविकांना खालील विचारांवर लाभ मिळणार आहे यामध्ये वात विकार गुडघे कंबर डोके मान दुखी संधिवात पित्त व त्वचेची विकार यासंबंधी मोफत तपासण्या आणि उपचार व औषधी देण्यात येणार आहे यासंबंधीचा विशेष कॅम्प संतोशी माता जवळ डॉक्टर सुनील जोशी यांच्या दवाखान्याच्या बाजूला राहणार आहे आणि असेच दुसरं अग्निकर्म विविध कर्म आयुर्वेदिक चिकित्साचे दुसरी शिबिर डॉक्टर अमोल खांदवे यांच्या मार्गदर्शनामध्ये भाविकांसाठी गुजरी चौकामध्ये ठेवण्यात आले आहे तसेच संस्थान द्वारा रक्तदानाचा आणि देवदानाचे सुद्धा कॅम्प लावण्यात आलेले आहे या ठिकाणी मेडिकेअर हॉस्पिटलच्या वतीने रक्तदानाचा कॅम्प घेण्यात येणार आहे आणि देहदानाच्या संबंधी लायन्स क्लब ऑफ पुसद यांच्या वतीने देहदान नोंदणी करण्यात येणार आहे रक्तदान आणि देवदान करणाऱ्या भाविकाला दोन थेट दर्शनाचे बेल्ट त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत या सोबतच एस आय आर जनगणनेमध्ये नाव नोंदविण्यासंबंधी मार्गदर्शनपर  विशेष स्टॉल तहसील कार्यालय पुसद द्वारा  करण्यात येणार आहे

या यात्रेसाठी पुसद पोलीस स्टेशन, नगर परिषद प्रशासन , महसूल विभाग आणि विज महावितरण चे तसेच सभोवताल परिसरातील रहिवासी आणि दुकानदार या सर्वानी सहकार्य केले आहे.तरी भाविकानी आषाढ़ी एकादशिला विठूरायाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.



Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...