मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धनकेश्वर महादेवांना ५६ लिटर दुग्धाभिषेक..
पुसद परिसरातील धनकेश्वर महादेव मंदिरात महाराष्ट्राचे सन्माननीय व लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय संस्कृतीची परंपरा जपत ब्रह्ममुहूर्तावर भगवान धनकेश्वर महादेवांना ५६ लिटर दुधाचा भव्य दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड ऊर्जा आणि जनसेवेची शक्ती लाभावी, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि देश अधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावा, अशी भगवान महादेवांच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली. भविष्यात त्यांचे नेतृत्व देशपातळीवर अधिक प्रभावी ठरो, अशीही मंगलकामना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या धार्मिक व प्रेरणादायी कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद भाऊ जिल्हेवार, महेश नाईक, अजय पुरोहित,विश्वास भवरे, रवी ज्ञानचंदाणी, दीपक परिहार, विश्वजीत सरनाईक, अश्विन जयस्वाल, संतोष आर्य, नारायणराव मुडानकर,गोविंदराव कुकडे, देविदास डोळस,माधवराव भरगाडे, विजय पुरोहित, संतोष मुकेश, लहुजी लांडगे आणि अक्षय थोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण होते. महादेवाच्या जयघोषात आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दीर्घायुष्याच्या मंगलकामनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
.jpg)

إرسال تعليق