⚡ ब्रेकिंग News

स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप व वृक्षारोपन..

 स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप व वृक्षारोपन..



पुसद परिसरात विविध संघटनेने एकत्र येऊन मानवीय कार्य करून मोठ्या उत्साहाने स्व. वसंतराव नाईक जयंती साजरी केली.

शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीचे नवे पर्व सुरू करणारे हरित क्रांतीचे प्रणेते,माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 01 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सेवादासनगर, ता. पुसद जि.यवतमाळ येथे स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज यांनी शिक्षण व वृक्षारोपण या विषयावर मार्गदर्शन केले. माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन,पुसद तर्फे शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व लेटर बुक देण्यात आले व वसुंधरा बहुउद्देशीय संस्था,पुसद व मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था, पुसद कडून तिथे वट वृक्षांचे रोपण करण्यात आले यावेळेस उपस्थित मान्यवर सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकजपाल महाराज,माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन,पुसद अध्यक्ष गजानन जाधव,पंजाब ढेकळे,अनंता चतुर,मधुकर चव्हाण,धनंजय आघाम,अरुण नागुलकर,सोनू पाटील,मंगेश भगत,दिगंबर देशमुख व सुंधरा बहुउद्देशीय संस्थेचे नितीन रमेश चव्हाण, मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था, पुसद चे पवन बोजेवार,अमित हटवार, पुस सेवा बहुउद्देशीय संस्था,पुसद चे अध्यक्ष जयसिंग राठोड,दादाराव पाईकराव,संजय ठाकरे , जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सेवादास नगर येथील शा. व्य. समितीचे अध्यक्ष प्रदीप राठोड ग्रा. सदस्य सुनील राठोड, रामेश्वर पवार ,सुहास जाधव, चंदन पवार, गणेश राठोड, विकास जाधव, आदित्य राठोड, अनुबाई राठोड आणि शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पवार ,स. शिक्षिका प्रीती राठोड व पार्डी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...