वेसवी येथे जेट्टी रस्ता मजबुतीकरण व दुरुस्ती कामांचे भूमिपूजन

 


मंडणगड: तालुक्यातील वेसवी येथील वाल्मीकीनगर भागातील जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच जेट्टी दुरुस्तीच्या कामांचे भूमिपूजन आज उत्साहात पार पडले. सुमारे ३ कोटी ४१ लाख ८५ हजार रुपयांच्या या विकासकामांचा शुभारंभ राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

या कामांमुळे परिसराच्या विकासाला गती मिळणार असून स्थानिक नागरिकांची मोठी सोय होणार आहे. विशेषतः वाहतूक सुलभ होऊन मच्छीमार आणि नागरिकांना जेट्टीपर्यंत पोहोचणे अधिक सुरक्षित आणि सोयीचे होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला जि.प. रत्नागिरी अध्यक्षा अस्मिता केंद्रे, जि.प. सदस्य व तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, उपसभापती दिपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, पंचायत समिती सदस्या दिप्ती घडशी, तालुका समन्वयक जितेंद्र दवंडे, सचिव सिद्देश देशपांडे, वाल्मीकीनगरच्या सरपंच नैना तबीब, विभागप्रमुख आनंद भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

या विकासकामांमुळे वेसवी परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...