कोकणातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय दुपदरीकरण होऊ देणार नाही : शौकत मुकादम

 

चिपळूण :संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सुमारे २६३ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल ( डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मात्र आमच्या प्रलंबित मागण्यानुसार,  कोकणातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न, चिपळूण - दादर पॅसेंजर तसेच चिपळूण ते कराड रेल्वेमार्ग असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय रेल्वे दुपदरीकारणाचे काम आम्ही होऊ देणार नाही असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी निवेदनाद्वारे  रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात ते म्हणतात की, कोकणातून ज्या रेल्वे गाड्या धावत आहेत त्याचा फायदा कोकणी माणसांपेक्षा परप्रांतीय प्रवाशांना जास्त होत आहे. हा कोकणवासियांवर अन्याय आहे.
उत्तर भारतात काही नवीन  गाड्या मुंबईतून सुरू करण्यासाठी कोकणी जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या गाड्या बंद करण्यात येत आहेत व आम्हाला सिग्नलचे प्रॉब्लेम सांगून वरिष्ठ अधिकारी आमची दिशाभूल करीत आहेत. मुंबई वरून येणाऱ्या व मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. यामध्ये कोकणातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये परप्रांतीयांची संख्या जास्त दिसत आहे. कोकणातील प्रवाशांना आरक्षण मिळत नाही व बसायलाही जागा मिळत नाही, यामुळे कोकणासाठी विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांकरिता स्वतंत्र गाड्या असल्या पाहिजेत. आम्ही कोकण रेल्वेच्या एकेरी व दुपदरीकरणासाठी वडिलोपार्जित जागा दिल्या आहेत. त्या आमच्या कोकणातील प्रवासाची गैरसोय करून सुपरफास्ट गाड्या धावण्यासाठी नाही, आमच्या मागणीप्रमाणे चिपळूण रेल्वे स्थानकावर सर्व सुपरफास्ट गाड्यांना थांबे व दादर-चिपळूण स्वतंत्र गाडी सुरू करावी तसेच अद्यापही रेल्वे भरतीमध्ये स्थानिकांवर अन्याय होताना दिसत आहे. आमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय दुपदरीकरण होऊ देणार नाही असा इशारा कोकण रेल्वे समितीचे अध्यक्ष शौकत भाई मुकादम यांनी दिला आहे. 
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...