'काबाडकष्ट करून स्वतःच्या मुलांना शिक्षणाची शिदोरी देणाऱ्या मातांचा तसेच परीक्षेत घवघवीत यश आणणाऱ्या त्यांच्या आपत्यांचा तनिष्काच्या वतीने सत्कार'
पुसद: - रेश्मा ओमप्रकाश शिंदे,
आज तनिष्काच्या वतीने पुसद येथे झालेल्या सर्व सभासद तनिष्का महिलांना तनिष्काचे गिफ्ट वाटप करून तनिष्का लीडरशिप प्रोग्राम व इतर तनिष्काचे येणाऱ्या दिवसात मानस प्रोग्राम काय काय असतील ते डिटेल मध्ये समजून सांगण्यात आले, याचसोबत नुकताच झालेल्या जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून ज्या काबाडकष्ट करून महिला आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन, शिक्षणाची शिदोरी देतात अशा महिलांचा सत्कार करण्यात आला, त्या मातां माऊलींना प्रेमाची शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला, तसेच परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या मुला मुलींचे गिफ्ट देऊन कौतुक करण्यात आले, हा क्षण त्या महिलांसाठी खूपच भावनिक होता कारण या महिलांचं मत त्यांनी व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वसाधारण महिला, मोलमजुरी व काबाडकष्ट करून आमच्या लेकरांना शिकवतो, आमची कधीच कोणी दखल घेत नाही मात्र तुम्ही आमची दखल घेऊन आमच्या मुलांसोबत आमचा देखील माण समान केलाय त्यासाठी त्या माय माऊलींनी अश्रूंनी भरलेले आपले डोळे पदरांनी पुसद स्वतःच्या भावना व्यक्त केला, तर दुसरीकडे त्यांच्या मुलांनी आपल्या आईसाठी केलेल्या कविता यावेळेस त्यांनी बोलून दाखवल्या आईवर असलेले प्रेम त्यांनी स्वतःच्या शब्दात व्यक्त करण्याचं मनोभावे प्रयत्न केला हे पाहून तिथे आलेल्या सर्वच महिलांचे डोळे देखील पाणवले, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सोनल ययाती नाईक उद्गम फाउंडेशनच्या संचालिका यांनी मानाचे स्थान भूषविले व यावेळेस त्यांनी तनिष्का मुख्यमंत्री चा फॉर्म भरत असल्याचे जाहीर करून सर्व महिलांनी तनिष्का झाल्यावर तनिष्कामार्फत त्यांना काय काय फायदे होतील हे देखील यावेळेस त्यांनी सांगून आईवर असलेले मुलांचे प्रेम जे शब्दात सांगता येत नव्हतं तरी मुलांनी केलेला प्रयत्न याची त्यांनी मनापासून कौतुक स्तुती केली,
यांच्यासोबतच काही तनिष्का महिला ज्या कवयित्री सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा आई या विषयावर मातृदिनाचे महत्त्व सांगत स्वतःच्या भावना व्यक्त करत कविता गायल्या,
उपस्थित तनिष्का महिलांना यावेळेस तनिष्काचे गिफ्ट वाटप करण्यात आले व आनंदाची गोष्ट असे की *पुसद येथील नामवंत संजय बजाज यांची बजाज ड्रेसेस तसेच बजाज अपलायन्स यामध्ये शॉपिंग केल्यावर प्रत्येक तनिष्का महिलेला दहा टक्के सूट देण्याचे कुपन यावेळेस बजाज ड्रेसेस कडून कुपन स्वरूपात करून देऊन ते देखील तनिष्कांना वाटप करण्यात आले* म्हणजे जर आता तनिष्का महिला 5000 ची शॉपिंग करेल तर तिला सरळ सरळ पाचशे रुपये डिस्काउंट मिळणार आहे, हे ऐकून अनेक महिला खुश झाल्या व नवीन काही महिलांनी आज तनिष्काची फॉर्म सुद्धा भरले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का समन्वयक रेश्मा ओमप्रकाश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन नम्रता दीपक लोखंडे यांनी केले,
कार्यक्रमाला सर्वच तनिष्का महिला व इतर नवीन काही महिला सुद्धा उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली,
कार्यक्रमामध्ये सर्व महिलांना उन्हाळ्याचा त्रास उष्णता थोडी कमी व्हावी या उद्देशाने थंडावा देणारे सॉफ्ट ड्रिंक देण्यात आली,
यावेळी विरंगुळा सभागृहाचे श्यामकाका जोशी यांचे मनापासून आभार मानण्यात आले त्यांच्यामुळे विरंगुळा हॉल उपलब्ध झाला, जो की सर्व तनिष्कांसाठी एकदम पुसद च्या सेंटरला आहे,
महिलांना तनिष्काची वाटप केलेले गिफ्ट अत्यंत चांगल्या दर्जाचे व कामी पडणारे असल्याचे यावेळेस एकमुखाने सांगितले व तसेच बजाज ड्रेसेस सारख्या ब्रँड शॉप मध्ये शॉपिंग करण्याची संधी मिळाल्यावर कधीच काही डिस्काउंट मिळाला नव्हता परंतु सकाळच्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठान मुळे तो डिस्काउंट मिळत आहे याचे देखील सर्व महिलांनी या वेळी आनंद व्यक्त करत बजाज ड्रेसेस चे आभार मानले.
यावेळी स्मिता पांडे, सुरेखा मोगरे, सुप्रिया पांडे, पद्मजा जोशी, दिपाली पांडे, इंदुमती राऊत, सुरेखा मस्के, सारिका कुंदर्गे, संध्या मस्के,
संतोषी शर्मा, सारिका शर्मा, चंचला कोरटकर, गीता चव्हाण, सरिता परसोडकर,लीलाताई गुघाणे,वैशाली चव्हाण, दिपाली तिवारी, जया दीक्षित,नेहा अडतकर, ज्योती वावरकर,मंदा राऊत, शुभांगी कुरवाडे इत्यादी तनिष्का महिला सदस्य उपस्थित होत्या.








إرسال تعليق