⚡ ब्रेकिंग News

आंतरराष्ट्रीय योग दिन नियोजनासाठी महाराष्ट्र योग शिक्षक संघाची सभा उत्साहात संपन्न

 आंतरराष्ट्रीय योग दिन नियोजनासाठी महाराष्ट्र योग शिक्षक संघाची सभा उत्साहात संपन्न 


पुसद : आगामी २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने नियोजन समितीची सार्वजनिक सभा रविवारी सकाळी ७:०० वाजता विरंगुळा योग केंद्र, पुसद येथे उत्साहात संपन्न झाली.

या सभेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पुढील कार्यक्रमांची दिशा, नियोजन, जनजागृती उपक्रम व योग प्रसाराबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, राज्य उपाध्यक्ष प्रवीण मस्के, यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनोज नाईक, विलासजी पलीकोंडावर, नरेंद्र सवाई सर तसेच समस्त योग साधिका, योग साधक आणि संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान २१ जून रोजी होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 “करू योग, राहू निरोग” महाराष्ट्र योग शिक्षक संघ

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...