महागाव तालुक्यातील विकास कामांना गती मिळणार का ?
खा . नागेश पाटील यांची महागाव तालुक्याला सापत्न वागणूक ! महागाव तालुका हिंगोली मतदारसंघात नाही का जनतेचा जाहीर सवाल ? आ .किसनराव वानखेडे आपण तरी महागाव तालुक्यावर लक्ष देणार का ? खासदार ,आमदार साहेबांना महागाव तालुक्यातील जनतेने भरभरून मतदान करून निवडून दिले आणि आपले कर्तव्य चोख बजावले ! लोकप्रतिनिधी मतदारसंघातील जनतेची सार्वजनिक विकास कामे करून उतराई करणार का ? असा सवाल महागाव तालुक्याची जनता आपणास करीत आहे ! आमदार किसनराव वानखेडे आणि जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी आमदार साहेब यांच्या विजयी सभेमध्ये महागाव तालुक्याला ५०% आणि उमरखेड तालुक्याला ५० % निधी देण्याचे कबूल केले होते ! नगरपंचायत ला निधी देऊन भागणार नाही ! तालुक्यातील विकास कामांवर आमदार यांचे अक्षम्य दुर्लक्ष ! महागाव तालुक्यातील अनेक रस्त्यांचे कामे मागील चार वर्षांपासून अपूर्ण आहेत ! वाकोडी - मोरथ मार्गावरील नदीवरील पुलाचे काम ३ वर्षापासून रखडले असून अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना रहदारीसाठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे ! पावसाळा सुरू झाल्यास रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे ! गुंज - माळेगाव पुलाचे काम अपूर्ण, वादग्रस्त असून इथे कित्येक ठेकेदार बदलून गेले परंतु काम अपूर्णच आहे ! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कामकाजामुळे महागाव तालुक्यातील विकास कामांची वाट लागली असून आमदार किसनराव वानखेडे यांनी संबंधित विभागाची झाडाझडी घेणे आवश्यक आहे ! सवना वाकोडी रोड साठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर असून साधी गिट्टी टाकण्याचे काम आजपर्यंत झालेलं नाही ! तालुक्यातील अनेक कामे अपूर्ण असताना ३१ मार्च पूर्वी ठेकेदारांना बहुतांश कामांची बिले अदा केल्याचे समजते ! महागाव तालुक्यात जिल्हा परिषद बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभागातील काही सहाय्यक अभियंते गेल्या सहा ते सात वर्षापासून महागाव येथे तळ ठोकून बसली आहेत त्यांचा पाठीराखा कोण ? काळी ( दौ ) परिसरातील माळवागद - सातघरी रस्त्याची काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे सुरू असून ढब्बर, गोटा न वापरता मुरूम मिश्रित माती टाकून काम करण्यात येत असल्याचे वास्तव चित्र आहे ! पुसद उपविभागातील महागाव तालुक्यातील अभियंता , ठेकेदार यांच्या संगणमताने विकास कामांच्या निधीची वाट लावल्या जात असून गाव पुढारी यांनी चौकशी केली असता ठेकेदार धमकी वजा ईशारे देत असल्याचे समजते ! वरील सर्व गंभीर समस्यांचा निपटारा कधी होणार आणि कसा होणार ? महागाव पंचायत समिती मधील बहुतांश ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकांनी घरपट्टी ,गाव नमुना आठ विविध योजनांच्या नावाखाली गावातील नागरिकांकडून पठाणी वसुली केली असून ती ग्रामपंचायतच्या खात्यात जमा न करता स्वतः स्वाहा केल्याच्या अनेक तक्रारी आहेत ! या संबंधी महागाव तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतींनी किती कर वसुली केली आणि तो कर किती ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा केल्याची खतर जमा करणे आवश्यक आहे ! तसेच महागाव तालुक्यातील जल जीवन च्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला अभियंता ठेकेदारांनी सुरुंग लावला असून 'हर घर नल योजना थट्टेचा विषय बनली आहे ! महागाव तालुक्यातील एकूण समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार किसनराव वानखेडे यांनी संबंधित सर्व विभागांच्या प्रमुखांसोबत एक जनता दरबार भरवून तालुक्यातील सर्व समस्यांचा, भ्रष्टाचाराचा निपटारा करणे आवश्यक आहे* !
Post a Comment