महामार्गावर कळबंणी येथे कंटेनरच्या धडकेत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

 खेड : मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील कळबंणी येथे मंगळवारी (२१ एप्रिल) रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला दिलेल्या धडकेत एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली . कळबंणी उपजिल्हा रुग्णालयाच्या शेजारी भुवड यांच्या टपरीसमोर हा अपघात झाला असून, एका ८० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम भागोजी बोबले (वय ८०, रा. कळबंणी बु., ता. खेड) हे रस्त्याच्या पलीकडे असलेल्या भुवड यांच्या टपरीवर बिस्किटे व इतर साहित्य घेण्यासाठी जात असताना, गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरने (एमएच ४६ बीबी ०८२६) त्यांना जोरदार धडक दिली. हा कंटेनर भरधाव वेगात व बेदरकारपणे चालवण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

या धडकेत बोबले यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी संतोष शाताराम बोबले (वय ५०, व्यवसाय शेती, रा. उधळे, खालची लाडवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी कंटेनर चालक अरशद सईद अहमद (वय २३, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...