*महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिवस सप्ताहाच्या समारोपानिमित्त तसेच पवित्र गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी भारतीय जनता पार्टी, पुसद यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले*.
कार्यक्रमाची सुरुवात रामनगर येथील श्री. रवीजी ज्ञानचंदानी यांच्या घरासमोरील प्रांगणात दहा फूट उंचीचे वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ योगगुरू श्री. वानरे सर व त्यांच्या सौभाग्यवती यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पुढे छत्रपती शिवाजी महाराज वॉर्ड येथे बालवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून विनोदभाऊ जिल्हेवार, विश्वजीत सरनाईक, दीपक सिंह परिहार,अजय पुरोहित, रवीजी ज्ञानचंदानी, विश्वास भवरे, अश्विन जयस्वाल, प्रशांत देशपांडे, देविदास डोळस, संतोष आर्य, बाळासाहेब उखळकर, संजय बजाज, शिवाजी थोरात, नारायणराव गायकवाड, संतोष मुकेश,
नारायणराव मुडाणकर, गोविंद कुकडे, माधव भरगाडे, अक्षय थोटे, विठ्ठल फुलाते, पिंटू अंभोरे तसेच ओमप्रकाश शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धन, गुरुजनांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा विधायक उपक्रमांद्वारे भारतीय जनता पार्टी, पुसद यांनी समाजसेवेचा संदेश दिला.



Post a Comment