*श्री.स्वामी समर्थ केंद्र, सप्तगिरी नगर, पुसद येथे पक्ष्यांकरिता जलपात्र व अन्नसाखळी उपक्रम*
उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांना पाणी व अन्नाची कमतरता भासत असल्याची जाणीव ठेवून सप्तगिरी नगर, पुसद येथील श्री स्वामी समर्थ मंदिर समिती यांच्या वतीने पक्ष्यांकरिता जलपात्र व अन्नसाखळी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
मंदिर समिती तसेच सेवाधारी भक्तांनी मंदिर परिसरात विविध ठिकाणी जलपात्र ठेवून त्यामध्ये दररोज स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच पक्ष्यांसाठी गहू, ज्वारी, बाजरी व इतर धान्य ठेवून अन्नसाखळीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील चिमण्या, कबुतरे, कावळे व इतर पक्ष्यांना मोठा दिलासा मिळत असून पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
“उन्हाळ्यात पक्ष्यांची काळजी घेणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे,” असा संदेश देत मंदिर समितीने नागरिकांनाही आपल्या घरासमोर जलपात्र ठेवण्याचे आवाहन केले आहे.
.jpg)
.jpg)
Post a Comment