⚡ ब्रेकिंग News

श्री स्वामी समर्थ केंद्र, सप्तगिरी नगर येथे कान-नाक-घसा तपासणी शिबिर उत्साहात संपन्न..

 श्री स्वामी समर्थ केंद्र, सप्तगिरी नगर येथे कान-नाक-घसा तपासणी शिबिर उत्साहात संपन्न...

 श्री स्वामी समर्थ केंद्र, सप्तगिरी नगर येथे स्व. चुनीलाल मोतीभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, यवतमाळ यांच्या सहकार्याने तसेच मातोश्री विठाबाई मारोतराव ट्रस्ट, पुसद यांच्या वतीने मोफत कान, नाक व घसा तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

गांधीवादी विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या डॉ. अनिल पटेल हे १९८० पासून विविध राज्यांतील ग्रामीण भागात आरोग्यसेवा देत आहेत. त्यांच्या या सेवाकार्यात चंद्रशेखर पिपराडे, दिलीप फुसे आणि कमलेश पांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

शिबिराच्या प्रारंभी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने डॉ. अनिल पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते,या शिबिरामध्ये नागरिकांची कान, नाक व घशाची तपासणी करण्यात आली. गरजूंना योग्य औषधोपचार तसेच आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.

श्री स्वामी समर्थ केंद्र सप्तगिरी नगर तर्फे सातत्याने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, आरोग्यविषयक व पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे परिसरातील नागरिक व भक्तगणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...