⚡ ब्रेकिंग News

*आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न..






आरोग्यावर्धिनी योग शिक्षक संघातर्फे येथील टेकडी गार्डन, तलाव लेआऊट येथील अतिशय निसर्गरम्य प्रसन्न वातावरणात जागतिक योग दिन अतिशय उत्साहाने संपन्न झाला.*

*योगदिनाचा प्रोटोकॉल राजुल शहा, कल्पना मस्के, शीतल मडके, वंदना कदम या योगशिक्षकांच्या नेतृत्वात संपन्न झाला. वंदना कदम यांनी प्रात्यक्षिकाची कृती आणि फायदे सांगितले.*

*या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजसेवक व उद्योजक दीपक आसेगावकर होते. तसेच प्रमुख पाहुणे विजया आसेगांवकर, डॉ कैलास बजाज, डॉ शशी बजाज, जेष्ठ योग शिक्षिका विजया चव्हाण व आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष शरद बजाज व्यासपीठावर हजर होते.*

*कार्यक्रमाची सुरुवात योग महर्षी पतंजली ऋषी यांच्या पूजनाने दिपप्रज्वलन करून सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी योगशिक्षक महेश वानखेडे यांनी उच्च स्वरात शंखनाद करून वातावरण मंगलमय केले. स्वागत समारंभात दीपक आसेगावकर व डॉ कैलास बजाज यांचा सपत्नीक तसेच विजया चव्हाण यांचा शाvल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राजूलताई शहा यांनी अतिशय गोड आवाजात योगगीत गायिले. संचलन मनोज नाईक यांनी केले.*

*कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक आसेगावकर यांनी आरोग्यवर्धिनी योग शिक्षकांच्या मागण्यावर भाष्य केले तसेच योगशिक्षक संघाने  विधानसभेवर व जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चा आणि आंदोलनाचे कौतुक केले. शासन त्यांना न्याय देईल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच डॉ कैलास बजाज यांनी टेकडी बगीचा करिता स्वखर्चाने 80 ट्रक काळी माती दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.*

*राज्य अध्यक्ष शरद बजाज यांनी शासनाने रोजगार व न्याय दिलातरच योगाचा प्रचार व प्रसार वाढू शकेल कारण योगशिक्षकच योगाचे शिक्षण देतात. त्यासाठी आमचा संघर्ष सुरु आहे, असे प्रतिपादन केले.*

*आभार प्रदर्शन शरद बजाज यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने योगसाधक, योगशिक्षक व नागरिक हजर होते.*

*या कार्यक्रमाला योगशिक्षक अनिता हिरवे, मनोरमा मनवर, गायत्री गडदे, अर्चना पडघणे, किरण नाईक, उज्ज्वला तळणकर, वैशाली दुबे, दुर्गा गवळी, अलका मंडाले, योगिता जांबुतकर, प्रवीण मस्के, महेश वानखेडे इत्यादी योगशिक्षक तसेच पदमजा जोशी, रेश्मा लोखंडे - शिंदे, शारदा वद्राबादे, किरण चव्हाण, सुरेखा महाजन, शोभा चव्हाण, शोभा विश्वम्भरे, कांताबाई वायकुळे, ज्योती जाधव, शशिकला चिलगर, प्रतिभा भोसले, ज्योती भागवत, विमल राठोड, अनिता कोकरे, नंदा देवकते, सिद्धी किलचे, अवनी वद्राबादे, संभाजी गवळी,नामदेव देवकते, अविनाश राठोड इत्यादी सहित असंख्य योगसाधक उपस्थित होते.*

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...