⚡ ब्रेकिंग News

पत्र लिहिण्याचा काळ संपला मात्र पत्रा त जपणारी काळजी आजही जिवंत आहे

 पत्र लिहिण्याचा काळ जरी संपला असेल तरी पत्र पाठवताना जी भावना जी आपुलकी जे प्रेम जपले जायचं ते आजही मनामनात जिवंत आहे याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे माझे मामे बहीण वर्षा ठाकूर यांनी मला लिहिलेले पत्र माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांसोबत शेअर करते कारण आपण सर्वजण पण माझा परिवार आहात...



Dear रेषु ताई,

लहानपनापासून मी तुला बघत आले.. तुझी छोटी बहीण म्हणून तुझं खूप कौतुक आहे आम्हा भावंडांना..,तुझ्या मामा- मामी ला!! खेळभांडी खेळायच्या वयात तू तुझं खेळणं सांभाळून आत्या ची काळजी घेत होतीस.. इयत्ता तिसरी ला असल्यापासून स्वयंपाकघर आणि तू हे एक समीकरण होत.. आणि त्यामुळे च आपण सुट्टी त एकत्र आल्यावर; त्याहीपेक्षा माझ्या वाढदिवसानिमित्त तू सगळ्यांना home made पिझ्झा बनवला होतास.. माझा तो 2000-2003 चा वाढदिवस अविस्मरणीय ठरला होता माझ्या साठी..! आई, पप्पा, अक्का, जिजी तर खुप करायचे ग.. पण आपण सगळे एकत्र माझ्या वाढदिवसाला हा निव्वळ सुंदर योगायोग ठरला होता..!!

किचन सोबतच कुठला कार्यक्रम, लग्न असलं की मोठ्यांसकट आम्ही तुझ्या पुढ्यात make -up साठी येऊन बसायचो!! किती उत्साहाने सगळ्यांना छान सजवत होतीस.. रेश्मा आहे.. छान natapata करून द्यायला.. असं एक गृहीत असायचं सगळ्यांचं!! खूप कमी वयापासून समाजात ही निडरपणे नेतृत्व करत आलीस.. वेगवेगळ्या कला आत्मसात केलीस.. सुंदर डान्स करतेस, शिकवतेस.., गरजे नुसार योगा करतेस, शिकवतेस.. कुटुंबात आवश्यक तेव्हा सगळ्या भावनांचा समतोल राखण्यासाठी कठोर पणे गोष्टी ठरवतेस.. नेहमी प्रफुलित राहण्याचा प्रयत्न करतेस! 

हे सगळं एक कणखर, परिस्थिती ची समज असणारी व्यक्ती च करू शकते.. खूप कमी व्यक्त झाली तरी आईला सगळं कळत असतं.. की आपलं लेकरू काय आहे.. किती गुणी आहे, कुठं कमकुवत आहे..!! हे सगळं बोलायच कारण एवढंच की.. तू खूप भरभरून केलं आहेस तुझ्या आईसाठी,भावंडांसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी सुद्धा!!. म्हणून तुझी छोटी बहीण म्हणून मी तुला हक्काने सांगेन की कोलमडून जाऊ नकोस.. कायम कणखर रहा! Show must go on Reshu tai! 

मी समजू शकते आई नसण्याची पोकळी.. पण तिचे आशीर्वाद, शुभेच्छा कायम आपल्या सोबत असतात.. म्हणून नव्या उमेदीने आज तुझ्या प्रकटदिनानिमित छान संकल्प कर आणि तो पूर्ण करण्यात busy रहा.. 

लवकरच भेटू आपण!!

तोपर्यंत आणखी एकदा माझ्या कणखर, मृदु, सुगरण, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गोड, लाडू सारख्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा!!...

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...