⚡ ब्रेकिंग News

भरधाव टिप्परने दोन दुचाकी स्वाराला उडविले टिप्परच्या धडकेत दोन ठार;एक महिला गंभीर जखमी .


भरधाव टिप्परने दोन दुचाकी स्वाराला उडविले 
टिप्परच्या धडकेत दोन ठार;एक महिला गंभीर जखमी 
प्रतिनिधी पुसद 
शहरापासून जवळच असलेल्या इंदिरानगर येथील डम्पिंग ग्राउंड जवळ टिप्पर चालकाने त्याच्या ताब्यातील टिप्पर भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालविल्याने दोन दुचाकी स्वराला उडविले आहे.त्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.ही दुर्दैवी घटना दि.२५ मे २०२६ रोजी च्या सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान घडली होती.अपघातामुळे काही वेळेसाठी वाहतुकीची कोंडी झाली होती.टिप्पर चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.भरधाव टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. 

अरविंद प्रल्हाद राठोड वय ४० वर्षे रा.कोठारी ता.महागाव व गणेश विष्णू जाधव वय २९ वर्षे रा.काटखेडा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिता अरविंद राठोड वय ३५ वर्षे रा. कोठारी ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरविंद व त्यांची पत्नी अनिता हे दोघेजण दुचाकी क्रमांक एमएच २९, एजे ७५७० ने पुसद येथून काटखेडाकडे जात होते. त्याचवेळी गणेश देखील त्याची दुचाकी क्रमांक एमएच २९, ए एल ६३६० ने त्याच्या गावी काटखेडा येथे जात होता. गणेश हा होमगार्ड असून तो पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयमध्ये प्रशिक्षणासाठी आला होता. अशातच टिप्पर चालक भारत शंकर पवार वय २८ वर्षे रा.काटखेडा याने त्याच्या ताब्यातील टिप्पर क्रमांक एमएच २१,बीएच ३७६० मध्ये काटखेडा येथून गिट्टी आणण्यासाठी खाली येतांना भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवीत दोन्हीही दुचाकीला जोरदार धडक दिली होती.त्या धडकेमध्ये अरविंद व होमगार्ड गणेशचा जागीच मृत्यू झाला होता.रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या दोघांची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली होती.त्यानंतर पोलीस शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी महिला अनिताला प्राथमिक उपचाराकरिता पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयाकरिता दाखल करण्यात आले होते.तर दोघांचा मृत्यू झाल्याने त्या दोघांचे शव पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले होते.अपघात प्रकरणी टिप्पर वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांनी कडून घेतल्या जात आहे.






Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...