महागाव शहर विकास आघाडी नगरपंचायत महागाव चे घनकचऱ्याच्या विषयी उदासीन धोरण !
१५ दिवस आधी मोठा गाजावाजा करून उमरखेड येथील सफाई कामगारांची वीस पंचवीस जणांची टोळी महागाव येथे आणून दोन चार दिवस साफसफाई केल्याचा गाजावाजा फोटो शूट झाले परंतु ! आता महागाव शहरांमध्ये कुठेही स्वच्छता दिसत नाही ! प्रभाग १० मधील बंद जलशुद्धीकरण केंद्राच्या आजूबाजूचा परिसर तसेच प्राथमिक मराठी शाळा ,आठवडी बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायत काळातील नादुरुस्त जलशुद्धीकरण केंद्रातून प्रभाग दहा व इतर भागांमध्ये पाणी सोडल्या जात आहे .परंतु नदीचे हे पाणी अंतर्गत जुन्या फुटलेल्या पाईपलाईन मुळे संडास बाथरूमचे वेस्टेज पाणी नळाच्या पाण्यासोबत येत आहे पाणी अत्यंत घाण असून सर्वत्र पाण्या
चा वास सुटला असून पिण्यासाठी तर सोडाच पण घर कामासाठीही कामी नसल्यामुळे सदर पाणीपुरवठा बिनकामाचा ठरतो आहे ! महागाव नगरपंचायत मधील नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी स्वच्छ सुंदर महागाव साठी सत्तापालट केला परंतु महागावच्या दशा आणि दुर्दशेत काहीही फरक पडला नाही नगरसेवकांचे मात्र चांगभले झाले अशी महागाव शहरात खमंग चर्चा चालू आहे ! नगरपंचायतची फायर ब्रिगेड घंटागाड्या आपत्कालीन वाहने जागेवरच ! नमो उद्यान निविदे बाबत अनेक वावड्या !



Post a Comment